नाशिक : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्वपदार आले असले तरी पुराचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीतून येथील रहिवासी आणि दुकानदार अजूनही सावरलेले नाही. याचा सर्वाधिक फटका हा माती कारागिरांना बसला आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे माती मिळणे कठीण झाल्याने यंदा मातीचे बैल करण्यासाठी बाहेरून माती मागवावी लागत आहे.गोदा काठानजीक असलेल्या कुंभारगल्लीत मातीपासून भांडी आणि सणासुदीला लागणाºया वस्तू बनविणाºया कारगिरांची मोठी वसाहत आहे.यंदा गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे माती काम करणाºया कारागिरांच्या व्यवसायावरही काही प्रमाणात पाणी फिरले आहे. गंगापूर धरणातून सात्याने विसर्ग होत असल्याने नदीची पातळी वाढत राहिल्याने नदीकाठावरील मातीदेखील वाहन गेली आहे. त्यामुळे या कारागिरांना पुरेशी माती उपलब्ध होऊ शकलेली नाही. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीयेथे प्रत्येक घरात मातीचे बैल तयार केले जात असत. परंतु यंदा मातीचे बैल कमी प्रमाणात होत आहेत. मातीच उपलब्ध न झाल्याने आणि बाहेरून माती घेऊन येणे महागडे ठरत असल्यामुळे यंदा एक-दोन घरांतील कारागिरांनीच मातीचे बैल बनविले आहेत. मातीचा तुटवडा आणि रंगाचे वाढलेले भाव याचा परिणाम दरावरदेखील होणार आहे.
मातीबैल बनविणाऱ्या कारागिरांना पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:34 AM
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्वपदार आले असले तरी पुराचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीतून येथील रहिवासी आणि दुकानदार अजूनही सावरलेले नाही. याचा सर्वाधिक फटका हा माती कारागिरांना बसला आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे माती मिळणे कठीण झाल्याने यंदा मातीचे बैल करण्यासाठी बाहेरून माती मागवावी लागत आहे.
ठळक मुद्देयंदा तुटवडा : मातीच नसल्याने कारागीर हवालदिल; महागड्या दराने माती विकत घेण्याची वेळ