शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

भाजपा आमदाराला महापालिकेचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:14 AM

शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची सुचविलेली जागा देण्यास मनपा महासभेने नकार देत वसंत गिते समर्थक नगरसेवकांच्या उपसूचनेवरून टाकळीरोड येथील जागेचा ठराव मंजूर केला आहे.

नाशिक : शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची सुचविलेली जागा देण्यास मनपा महासभेने नकार देत वसंत गिते समर्थक नगरसेवकांच्या उपसूचनेवरून टाकळीरोड येथील जागेचा ठराव मंजूर केला आहे. सदरचा ठराव प्रशासनाने शासनाकडे रवानाही केला आहे. स्त्री रुग्णालयाच्या जागेच्या वादात वसंत गिते वरचढ ठरल्याने भाजपात फरांदे-गिते यांच्यातील संघर्ष यापुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाची फरपट सुरूच आहे. शासनाने शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेकडे जागा मागितली आहे. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे या पाठपुरावा करत आहेत. सर्वप्रथम संदर्भ रुग्णालयाच्या जागेत सदर स्त्री रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, सदर जागा ही अपुरी असल्याने व त्याठिकाणी अन्य रुग्णांचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयासाठी वडाळा शिवारातील जागा प्रस्तावित करण्यात आली. परंतु, मागील पंचवार्षिक काळात स्थानिक नगरसेवक संजय चव्हाण यांनी त्यास हरकत घेतली आणि सदर जागेत अगोदरच रुग्णालय उभारणीचे नियोजन असताना पुन्हा स्त्री रुग्णालयाचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे मनसेच्या काळात सदरचा प्रस्ताव फेटाळला होता. आता महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा जागा बदल करत भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहा जवळील जागा रुग्णालयासाठी प्रस्तावित करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्तावही महासभेवर ठेवण्यात आला. परंतु, स्थानिक नगरसेवक व वसंत गिते समर्थक अर्चना जाधव यांनी सदरचा प्रस्ताव तूर्त बाजूला ठेवण्याची विनंती केली होती. दरम्यान, त्यावर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी उपसूचना देत गायकवाड सभागृहाच्या जागेत वाहनतळ असल्याने सदर जागेऐवजी टाकळीरोड याठिकाणची जागा प्रस्तावित केली. महासभेने आजी-माजी आमदारांच्या या संघर्षात वसंत गिते यांच्या बाजूने कौल देत टाकळीरोडची जागा स्त्री रुग्णालयासाठी मंजूर केली आणि तसा ठराव प्रशासनाला पाठविला. प्रशासनानेही सदरचा ठराव शासनाला रवाना केला आहे. त्यामुळे, स्त्री रुग्णालयाच्या या जागेच्या वादात वसंत गिते यांची सरशी झाल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि गिते यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.आयुक्तांकडून जागांची पाहणीमहापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि. २५) स्त्री रुग्णालयासाठी प्रस्तावित केलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहालगत आणि टाकळरोड येथील जागांची पाहणी केली. महासभेने केलेला टाकळीरोडचा ठराव प्रशासनाने शासनाला पाठविला असल्याची माहिती आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, भाजपा आमदाराचाच प्रस्ताव महासभेने ठोकरून लावल्याने फरांदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहणार आहे.