सिन्नर: येथील शेठ ब.ना. सारडा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले,कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या कोविड १९ मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता झटत असलेल्या वैद्यकीय अधिकारी ,डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार, डॉ.निर्मला सुशील पवार- गायकवाड, तर सफाई कर्मचारी दिलीप शेख, दीपेश प्रकाश बैद्य, शोहेब दिलीप शेख यांचा कोरोना योद्धे म्हणून, त्यांच्या कार्याचा सन्मान, कार्याप्रती आदर भाव व्यक्त करण्यासाठी तर भागवत निवृत्ती रणदिवे यांचा माजी सैनिक म्हणून शाल व सन्मानपत्र देऊन विद्यालयाचे वतीने गौरव करण्यात आला.डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की लोकांचे भले करणे हे आमचे कर्तव्य आहे,प्रामाणिकपणे श्रम करून लोकांना सेवा करून लोकांचे भले करायचे आहे, लोकांची सेवा करणे म्हणजेच पवित्र जीवन,हेच आम्ही शिकलो आहोत, हे आमचे व्रत आहे, हे व्रत आम्ही कधीही सोडणार नाही. हा सेवेचा आनंद आम्ही सतत घेत राहू व आपल्या विद्यालयाने याठिकाणी बोलावून आमच्या कार्याचा गौरव केला, या गौरवामुळे एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे.अध्यक्षस्थानावरून बापूसाहेब पंडित यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की देव,देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व देतो, तो कृतार्थ होतो.त्यातच खरे वैभव आहे, इतर कुठल्याही संचयात नाही. हे आजच्या कार्याच्या गौरवातून सिद्ध होत आहे.या यावेळी मंचावर प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक सुनील हांडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल मुळे, प्राचार्य शिवराज सोनवणे उपस्थित होते.संजय वाघ यांनी सूत्रसंचलन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ब.ना. सारडा विद्यालयात स्वातंत्र्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 4:50 PM
सिन्नर: येथील शेठ ब.ना. सारडा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले,कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ठळक मुद्देभागवत निवृत्ती रणदिवे यांचा माजी सैनिक म्हणून विद्यालयाचे वतीने गौरव करण्यात आला.