या प्रकरणी सागर प्रकाश परदेशी (वय ३८, क्रांतिनगर मखमलाबाद रोड) यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी बापू सुभाष लकडे (आव्हाड चाळ क्रांतीनगर) याला अटक केली आहे. संशयित बापू लकडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवायासह सरकारवाडा आणि मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातही गुन्हे आहेत.
--------------
भाडेकरूंच्या डोक्यात बाटली फोडली
नाशिक : देवळाली कॅम्पला हाडोळा येथे भाडेकरू म्हणून राहात असलेल्या एकास चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, डोक्यात बाटली फोडल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी परेश ज्ञानेश्वर मोरे (वय ३०, आंबेडकर सोसायटी, हाडोळा) याच्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रवण बागूल, निखिल आगळेकर, प्रतीक गायकवाड, कुणाल आगळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार व संशयित हे देवळाली कॅम्पला हाडोळा भागातील आंबेडकर सोसायटीत थोरात यांच्या घरात राहायला आहे. बुधवारी (दि. २८) सायंकाळी आनंदरोडवरील डॉ. आंबेडकर हॉलजवळ त्यांची गाठभेट झाली असता, चौघा संशयितांनी तुम्ही भाडेकरू आहात तुमचा येथे राहण्याचा काय संबंध असे विचारीत प्रवण बागूल याने डोक्यात बाटली फोडली, इतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, कोयत्याने कापून टाकण्याची धमकी दिली.
-------------------