लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना संशयित महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृत्यूचा अहवाल येण्याची वाट न पाहताच तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह घरी पोहोचल्यानंतर संबंधित महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्या महिलेच्या घरी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. मात्र, कोणताही अहवाल प्राप्तीनंतरच कोणताही मृतदेह ताब्यात देण्याच्या शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे.पंचवटीतील फुलेनगर परिसरातील एका महिलेला संशयित म्हणून १९ जूनला महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, २१ तारखेला त्या महिलेला अत्यावस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हीलमध्ये दाखल केल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाने त्या महिलेचा मृतदेह बाधित असण्याची शक्यता गृहित धरून नियमानुसार पूर्णपणे पॅक करून मृतदेह शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी अमरधामला पाठविला. मात्र, नातेवाइकांनी परस्पर तो मृतदेह घरी नेऊन त्याचे आवरण काढून त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी अमरधामला नेला. अमरधाममध्ये अंत्यसंस्कारापूर्वी मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित नातेवाइकांकडे महिलेच्या मृत्यू दाखल्याबाबत विचारणा केली. त्यानंतर संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी झाकीर हुसैन रुग्णालयात अहवालाबाबत विचारणा केली असता ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. अखेरीस ती महिला बाधित असल्याचा अहवाल असल्याने मृतदेह नियमानुसार पूर्णपणे झाकल्याशिवाय तसेच अहवाल हातात दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यासदेखील अमरधामच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे नातेवाइकांनी पुन्हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेऊन तो वेष्टनात गुंडाळून देण्याची विनंती केली. त्यावर जिल्हा रुग्णालयाकडून सदर मृतदेह नियमानुसार वेष्टनात गुंडाळून अमरधामला पाठविला होता.तो मृतदेह पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात आणि खोललेल्या अवस्थेत कसा आणला? याबाबत विचारणा केली असता काही नातेवाइकांनी चूक झाल्याचे कबूल केले, तर काहींनी मृतदेह असाच मिळाला होता, असा पवित्रा घेतला. अखेरीस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील कर्मचाºयांनी पुन्हा तो मृतदेह गुंडाळून अमरधामला अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला.जिल्हा रुग्णालयाकडे सदर महिला अत्यवस्थ झाल्यानंतर आणण्यात आली. त्यापूर्वी ती मनपाच्या रुग्णालयात असताना तिचा स्वॅब घेऊन नमुना अहवालासाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, महिला मृत झाल्यानंतर तिची बॉडी नियमानुसार वेष्टनात गुंडाळून थेट अंत्यसंस्कारासाठी अमरधामला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, नातेवाइकांनी परस्पर बॉडी घरी नेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा रुग्णालयाने सर्व कार्यवाही ही नियमानुसार केली आहे.- डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकया प्रकारात संबंधित महिला ही आमच्याकडून सिव्हीलला जिवंत गेली होती. महिलेचा मृत्यू हा सिव्हीलमध्ये झाला असल्याने त्यानंतरची कार्यवाही सिव्हीलनेच नियमानुसार करणे अपेक्षित होते. मनपा कर्मचाºयांनी सर्व काम नियमानुसार केले आहे. तसेच याबाबत कुणीही तक्रार केली नसल्याने कोणत्याही चौकशीचा प्रश्नच निर्माण होत नाही.- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका
कोरोना संशयिताचा अहवाल मिळण्यापूर्वीच मृतदेह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:34 PM
नाशिक : कोरोना संशयित महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृत्यूचा अहवाल येण्याची वाट न पाहताच तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह घरी पोहोचल्यानंतर संबंधित महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्या महिलेच्या घरी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. मात्र, कोणताही अहवाल प्राप्तीनंतरच कोणताही मृतदेह ताब्यात देण्याच्या शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे.
ठळक मुद्देभोंगळ कारभार : शासन आदेशाची पायमल्ली; महानगरपालिका-जिल्हा रुग्णालय यांच्यामधील असमन्वयाचा परिणाम