मालेगाव : औरंगाबाद येथे मुस्लिमांच्या धार्मिक इस्तेमाच्या समारोपानंतर बॉम्बस्फोट झाल्याची अफवा शहरात पसरल्याने नागरिकांत घबराट पसरून एकच धावपळ उडाली. अखेर पोलिसांना शहरात ध्वनिक्षेपकावरून अफवा असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन करावे लागले. औरंगाबाद येथे तीन दिवस झालेल्या इस्तेमासाठी शहरातून हजारो मुस्लीम बांधव वाहनांद्वारे गेले होते. इस्तेमा शांततेत आटोपून तेथे गेलेले नागरिक आपापल्या गावाकडे परतत असतानाच औरंगाबादमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची ‘अफवा’ वाºयासारखी शहरात पसरल्याने नागरिकांची एकच धावपळ, घबराट पसरली. फोनाफोनी झाली. शहरातील गल्ल्यांमध्येही शुकशुकाट पसरला तर इस्तेमासाठी गेलेल्या नागरिकांच्या घरी नातलगांमध्ये प्रचंड घबराट पसरली. पोलिसांनी शहरात वाहनांद्वारे अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखा, असे आवाहन केले. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे गावात कोणताही ‘अनर्थ’ घडला नाही. पोलिसांनीही ‘व्हॉट्सअप’वर संदेश टाकत नागरिकांना शांतता व सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले तसेच ‘अफवा’ पसरविणाºयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले.
बॉम्बस्फोटाच्या अफवेने मालेगावी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:45 AM