शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

रस्त्यांसाठी काढणार कर्जरोखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:33 AM

कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थितीत सापडलेल्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारे घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देआॅनलाइन महासभेत निर्णय : करवाढ नाहीच२,३९० कोटींचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थितीत सापडलेल्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारे घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २९) झालेल्या सभेत महापौरांनी शहरातील डिपी आणि कॉलनी रस्त्यांच्या कामांसाठी कर्जरोखे काढण्याचा अथवा डिफर्ड पेमेंटचा पर्याय स्वीकारण्याचे जाहीर केले. याशिवाय ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर गोदा स्वच्छता अभियान राबवितानाच महत्त्वाकांक्षी फाळके स्मारकाचे पुनरुज्जीवन, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागोजागी स्क्रि निंग स्पॉट्स व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह विविध घोषणा महापौरांनी केले.महापालिकेची महासभा मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी तयार केलेले २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक विद्यमान सभापती गणेश गिते यांनी महासभेत महापौर कुलकर्णी यांना प्रत्यक्ष सादर केले. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील त्रुटींवर बोट ठेवताना निधीचे समतोल वाटप करावे तसेच खेडे विकास निधी द्यावा, अशा प्रकारच्या सूचना पाच तास चाललेल्या अंदाजपत्रकीय चर्चेत नगरसेवकांनी सुचवल्या. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे हे जन्मशताद्बी वर्ष असल्याने फाळके स्मारक येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा करण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केला. शहरातील सर्व नैसर्गिक नाल्यांचे पाणी बारमाही वाहणार नाही यासाठी समांतर मलवाहिका टाकून ते पाणी मलनिस्सारण केंद्रांकडे वळविले जाईल. त्याचप्रमाणे भाजीमार्केट, बहुमजली वाहनतळ, सीएसआर निधीतून पर्यटन विकास, रोजगार निर्मितीसाठी आयटीपार्क व पंचवटीतील परशराम पुरिया पार्क येथे महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी ३७ पदाधिकारी व नगरसेवकांनी सहभाग घेतला. चर्चेअंति महापौर कुलकर्णी यांनी नगरसेवकांच्या उपसूचना व दुरुस्तीसह या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली जात असल्याचे जाहीर केले.स्थायी समितीची शिफारसआयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फेब्रुवारी महिन्यात दोन हजार १६१ कोटी ७९ लाख रु पयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते, तर स्थायी समितीने जमा बाजूत २२८ कोटी ५५ लाखांची भार घातली होती. सदरचे २ हजार ३९० कोटी ४३ लाखांचे अंदाजपत्रक सादर करताना सभापतींनी दीडशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याची शिफारस केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMONEYपैसाTaxकर