इंदिरानगर : शिवाजीवाडी परिसरातील जनावरांच्या हाडांचे गुदाम अद्यापही हलविण्यात आलेले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. एक वर्षापूर्वी हाडांचे गुदाम नागरी वस्तीतून हलवण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.शिवाजीवाडी, नंदिनीनगर, भारतनगर परिसर हातावर काम करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे सहा ते सात हजार लोकांची वस्ती परिसरात आहे. परिसरातील बहुतेक विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. मनपाची मराठी व उर्दू शाळा सकाळ व दुपार सत्रात भरते. याठिकाणी सुमारे २० वर्षांपासून परिसरात जनावरांच्या हाडांची सात ते आठ गुदाम असून, त्यापैकी तीन ते चार हाडांची गुदामे महापालिकेच्या शाळेलगतच असल्याने शाळेत शिक्षण घेणाºया सुमारे सातशे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या जनावरांच्या हाडांच्या गुदामांमध्ये दिवसभर वाहनांद्वारे हाडे व कातड्यांची ने-आण केली जाते. यावेळी वाहनांत असलेल्या जनावरांच्या कातड्यातून रक्त पडते. हाडे व कातड्यांचे तुकडेदेखील पडत असतात. त्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत असते तसेच या हाडाच्या गुदामांमधून अळया बाहेर पडून नागरिकांच्या घरात शिरतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सुमारे एक वर्षापूर्वी आरोग्य सभापतींनी तातडीने जनावरांच्या हाडांची गुदामे नागरी वस्तीतून हलवण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप परिस्थिती जैसे थेच असल्याने त्यांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे दिसून आले. मनपा प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर दिसून येत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून पाहणीगेल्या दहा वर्षांत अनेक वेळा आरोग्य अधिकाऱ्यांनी जनावरांच्या हाडांच्या गुदामाची पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले होते. तसेच आरोग्य सभापती व नगरसेवकांनी पाहणी करून हाडांची गुदामे हलविण्याचे आदेश दिले होते, परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
हाडांच्या गुदामामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:43 AM