नाशिक : महापालिका परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या माहितीपुस्तिकांचे गुरुवारपासून (दि. १०) वाटप सुरू झाले आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या आणि अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिकेतील यूजर आयडी व पासवर्ड व अन्य माहितीच्या आधारे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून घेतला जाणार असून, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास माध्यमिक शाळेतून प्रवेशाची माहितीपुस्तिका दीडशे रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे. या पुस्तिकेतील यूजर आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि या दोन टप्प्यात पूर्ण करावी लागणार असून, अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरावा लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी माहितीपुस्तिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:17 AM