नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत ११ ग्रंथपेट्या सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना झाल्या आहेत. या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून अश्विनी कंठी काम पाहत आहेत. त्यांच्या पुढाकाराने योजनेचा प्रारंभ होऊन वाचकांपर्यंत मराठी ग्रंथसंपदा पोहोचणार आहे. सॅनफ्रॅन्सिस्कोमधील एसएफओबी भागात अश्विनी कंठी यांच्यासमवेत रेणुका इनामदार, वैशाली उत्तुरकर, वैशाली फडके, अमोल लेले, चक्रपाणी चिटणीस, आदित्य खेर, अमिता वैद्य, अनिल शहा, मंगेश जोशी यांचा उपक्रमात सक्रिय सहभाग आहे. एका ग्रंथपेटीत २५ पुस्तके आहेत. प्रत्येक पेटीतील पुस्तके वेगवेगळी आहेत. विविध भागांत या पेट्या वाचकांच्या गटाला तीन महिन्यांसाठी उपलब्ध असतील. तीन महिन्यांनी पेट्या परस्परांमध्ये बदलल्या जातील. पेट्या वाढत जातील तसे अधिकाधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध होतील. दरम्यान, आतापर्यंत दोन कोटींची ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत पोचवण्यात आली असल्याची माहिती रानडे यांनी दिली.वाचकांची पसंतीया उपक्रमांतर्गत महाराष्टÑ, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्वासा, तामिळनाडू, कर्नाटक, दुबई, नेदरलॅँड, टोकियो, अॅटलांटा, स्वीत्झर्लंड, आॅस्ट्रेलिया, फिनलॅँड, मॉरिशस, ओमान, मस्कतमधील मराठी वाचकांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे विनायक रानडे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे पुस्तके सॅनफ्रॅन्सिस्कोच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:38 AM