सुरगाणा : घाटमाथ्यावरील बोरगाव परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर मंगळवारी दुपारी सुरगाणा पोलिसांनी धाड टाकून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे गावठी दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले.बोरगाव परिसरातील धोडांबे जवळील नदीलगत असलेल्या विहिरीजवळ दोन ठिकाणी गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी करून सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे गावठी दारूचे रसायन नष्ट केल्याने अवैधरीत्या गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक पोलीस निरीक्षक मच्ंिछद्र दिवे, एएसआय रमेश निकम, हवालदार भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल डंबाळे, जोपळे आदींनी ही कारवाई केली. पोलीस शिपाई महेश डंबाळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरगाव परिसरात गावठी दारूभट्ट्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:09 PM
सुरगाणा : घाटमाथ्यावरील बोरगाव परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर मंगळवारी दुपारी सुरगाणा पोलिसांनी धाड टाकून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे गावठी दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले.
ठळक मुद्देगावठी दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले.