नाशिक : डोक्यावर बॅँकेचे लाखो रुपयांचे कर्ज असलेल्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६४वर पोहोचली आहे. ज्ञानेश्वर शिवराम शिंदे (वय ४३, रा. वनसगाव, ता. निफाड) असे शेतकऱ्याचे नाव असून, त्याच्या गट नंबर १७९/१ मधील ०.७४ आर क्षेत्रावर द्राक्षबागेसाठी शिंदे यांनी स्टेट बँक तसेच विविध कार्यकारी सोसायटीकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जबाजारी पणाला कंटाळून मंगळवारी शिंदे यांनी विषारी औषध सेवन केले, त्यात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
वनसगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: August 20, 2016 1:42 AM