कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त हेमंत बोरसे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.वानूबाई पवार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी सहायक निबंधक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेऊन निवडणूक घेण्यात आली. बोरसे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून संचालक सुनील देवरे तर अनुमोदक म्हणून संचालक मनोज शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी सभापती धनंजय पवार, मावळत्या उपसभापती वेणूबाई पवार, संचालक सुनील महाजन, शीतलकुमार अहिरे, हरिश्चंद्र पगार, ज्ञानदेव पवार, रमेश पवार, साहेबराव पाटील, देवेंद्र गायकवाड, बाळासाहेब वराडे, रामचंद्र गायकवाड, विष्णू बोरसे, मोहन जाधव, शंकर निकम, जितेंद्र पगार आदी उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित उपसभापती हेमंत बोरसे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने सुनील महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, भगवान पाटील, संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कळवण बाजार समिती उपसभापतिपदी बोरसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 9:16 PM