शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

ठेंगोडा गटात बोरसे यांचा प्रचार दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:44 AM

सटाणा : बागलाण मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त साधून व ठेंगोडा येथील स्वयंभू गणपतीला नारळ वाढवून सकाळी नऊ वाजता ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्दे ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात

सटाणा : बागलाण मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त साधून व ठेंगोडा येथील स्वयंभू गणपतीला नारळ वाढवून सकाळी नऊ वाजता ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे, पंचायत समिती सदस्य ज्योती अहिरे, माणिक अहिरे, रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, सुरेश मोरे, अण्णासाहेब सावंत, साहेबराव सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप बोरसे यांनी निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. १९९५च्या निवडणुकीत जनतेने मला विश्वासाने निवडून दिल्यानंतर तत्कालीन युती सरकारच्या काळात सिंचन प्रश्नांना हात घालून हरणबारी उजवा-डावा कालवा, तळवाडे भामेर पोहोच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ या प्रकल्पांना मंजुरी मिळवून कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. शेतीला पाणी, टॅँकरमुक्त तालुका, गाव आणि शिवार तेथे रस्ता, पिकाला योग्य भाव, मोफत शिक्षण यांच्यासाठीच आपला लढा राहणार आहे, असे बोरसेंनी यावेळी सांगितले.या प्रचार दौºयात सेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, संदीप खैरनार, शरद शेवाळे, राजनसिंग चौधरी, मोरेनगरचे सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच भरत अहिरे, दºहाणेचे सरपंच परशुराम पाकळे, संदीप पवार ,रुपाली पंडित, आराईच्या सरपंच मनीषा अहिरे, भाक्षीच्या सरपंच पूनम सूर्यवंशी, ठेंगोड्याचे सरपंच मधुकर व्यवहारे, शांताराम वाघ, जिभाऊ जाधव, रामदास बागुल, चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे, जितेंद्र गांगुर्डे, डॉ. गोकुळ अहिरे, सुरेश अहिरे, दिलीप अहिरे, जुने निरपूरचे प्रवीण सूर्यवंशी, गोरख चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, चेतन वाघ, नवे निरपूरचे सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी, दादा पगारे आदी सहभागी झाले होते.सटाण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सभाबागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ शहरातील पाठक मैदानावर बुधवारी (दि.९) दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. या सभेस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baglan-acबागलाण