नाशिक : अशोका मार्ग भागातून दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून या घटनेतील संशयित अरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरीने काढून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तुळजाभवानी मंदिराजवळ राहणारा रंगकाम व्यावसायिक संदिप हिरालाल गुप्ता त्याच्या मित्रासमवेत अशोकामार्ग परिसरातून जात असताना संशयित आरोपी सागर मंगेश भडांगे (२३) व दिलीप देवराम महाले (२९) मोठमोठ्याने आरडाओरडा करीत आम्ही पोलिसांना घाबरत नसल्याचे सांगत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी संदीप गुप्ता व त्याच्या मित्रांना अडवून गुप्ता याच्या गळा ल्या चाकू लावून दुखापत केली. तसेच त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम.एच ४१ एच ६९९ बळजबरीने हिसकावून चोरून नेली. या झटापटीत आरोपींनी गुप्ताच्या मित्राच्या खिशातून पाचशे रुपयेही बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भडांगे व महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ यांनी सांगितले.
चाकूचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:56 PM
नाशिक शहरातील अशोका मार्ग भागातून दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून या घटनेतील संशयित अरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरीने काढून घेतल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देअशोका मार्ग भागात दहशत सरविण्याचा प्रयत्न गुंडांकडून चाकूचा धाक दाखवत दुचाकीची चोरी पोलीसांनी आवळल्या दोन्ही संशयितांच्या मुसक्या