नाशिक : बांगलादेशी मुलीची देहविक्रयसाठी दहा महिन्यांपुर्वी तिच्या मावशीकडून सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखान्याच्या ‘नानी’ला विक्री केल्याप्रकरणी नाशिक ग्रामिण पोलिसांनी दोघा संशयितांना जुने नाशिकमधून अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तीची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या पथकाने जुन्या नाशिकमधून संशयावरून आसिफ फारूख शेख (२६, रा. चौकमंडई), सिध्दार्थ गौतम सोनकांबळे (२१, रा.भीमवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.एकूणच बांगलादेशी युवतीच्या तस्करीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून या प्रकरणात बहुसंख्य संशयितांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांनी तीन पथके तपासासाठी नियुक्त केली आहेत. पिटा कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यानुसार मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील वेश्या व्यवसाय सील करण्यासाठीचा प्रस्ताव दराडे यांनी जिल्हाधिका-यांना पाठविला आहे.खरेदी करणाºया सिन्नरच्या मुसळगाच्या ‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी उर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पिडितेवर बलात्कार करणारा नानीचा नराधम मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तीघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पिडित मुलीला देहविक्रयच्या नरकारत ढकलणारी तिची मावशी व काही दलाल अद्याप फरार असून ग्रामिण पोलीस करीत आहेत.
देहविक्रयसाठी बांगलादेशी मुलीच्या तस्करीप्रकरणी जुन्या नाशिकमधून दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:05 PM
बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तीची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
ठळक मुद्दे कुंटणखान्याच्या ‘नानी’ला विक्रीबांगलादेशी युवतीच्या तस्करीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी