सिडको : अंबड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकाच्या डोक्यात मद्यपींच्या टोळीतील एकाने दारु ची काचेची बाटली फोडून गंभीर जखमी केले. तसेच यावेळी अन्य दोघांनी लथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरु वात केली. यावेळी रिहवाशांनी धाव घेत होमगार्डची सुटका केली.अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब रामदास सोनवणे ( 34 रा. साई पूजा रो हाऊस महाजन नगर ) हे रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास रात्रपाळी साठी गणवेशावर पोलीस ठाण्यात येण्यास निघाले असता रस्त्यातच असलेल्या कस्तुरी सुपर मार्केट समोर एका स्थानिक रिहवाशाने त्यांना थांबवून त्या समोरील मोकळ्या जागेत काही युवक दारू पिऊन गोंधळ घालीत असल्याचे सांगितले. यावरून सोनवणे यांनी तीन युवकांना या ठिकाणी दारू पिऊ नका व घरी जा असे सांगितले. दरम्यान याचा राग येत संशियत संकेत भालेराव ( रा. मोरवाडी ) ,विकी जाधव ( रा. सातपूर ) तिसरा युवक फरार आहे. यांनी मारहाण करण्यास सुरु वात केली. दरम्यान त्यातील एकाने सोनवणे यांच्या डोक्यात दारूची काचेची बॉटल फोडल्याने ते रक्तबंबाळ झाले. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी बघितल्यावर त्यांनी सोनवणे यांची मारहाण होत असताना सुटका केली व तात्काळ अंबड पोलीस ठाण्याला माहिती दिली व दोन युवकांना पकडून ठेवले. अंबड पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही युवकांना ताब्यात घेतले; मात्र तिसरा युवक हा पळून गेला. दरम्यान याप्रकरणी सरकारी कामात अडथळा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.