नाशिक : शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी शहरासाठी दोन महानगरप्रमुखांची नेमणूक करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. माजी नगरसेवक सचिन मराठे व महेश बडवे या दोघांवर शहराची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेअंतर्गत करण्यात आलेल्या या नेतृत्वाबदलाविषयी सैनिकांमध्ये उलट सुलट चर्चा केली जात असून, महानगरप्रमुखाप्रमाणेच जिल्हा प्रमुखाबाबतही लवकरच बदल होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेंतर्गत गेल्या काही दिवसांपासून दोन गट पडल्याचे बोलले जात आहे. एका गटाची यात सरशी होऊन त्यांनी या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीदेखील मिळवून आणल्याने अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर उफाळून आली व त्यातून एकमेकांच्या विरोधात तक्रारीही केल्या गेल्याची चर्चा होत आहे. तत्पूर्वीच महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपासूनच शिवसेना गटबाजीत विखुरली गेल्याने त्याचा परिणाम मोठ्या पराभवाला सामोरे जाण्यात झाला. तेव्हाच नेतृत्व बदलाची मागणी व चर्चा होत असताना पक्षाने एक वर्षानंतर त्यावर गांभीर्याने विचार केल्याचे मानले जात आहे. महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना या पदावर चार वर्षे झाली असून, त्यांच्याकडे महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदाचीही जबाबदारी पक्षाने टाकली आहे. त्यामुळे दोन्ही पदांना न्याय देणे शक्य नसल्यामुळे बोरस्ते यांच्यावरील भार कमी केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.नाशिक महानगरप्रमुख म्हणून सचिन मराठे यांच्याकडे मध्य नाशिक व देवळाली मतदारसंघाची तर महेश बडवे यांच्याकडे पंचवटी व सिडको या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शनिवारी या दोघांनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पाचारण करून पक्षाच्या जबाबदारीची जाणीव करून देताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सेनेच्या मुखपत्रातून या दोघांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पक्षाची मुळापासून बांधणी करूशिवसेनेत गेली २८ वर्षे काम करीत असून, त्याकाळी असलेले पक्ष संघटनाला मुळापासून बांधण्यासाठी प्रयत्न करू तसेच सैनिकांच्या बळावर पक्षाचा शहरात झंझावात निर्माण करून सेनेच्या मूळचा आक्रमकपणा पुन्हा निर्माण करण्याला प्राधान्य दिले जाईल.- सचिन मराठे,महानगरप्रमुख, नाशिक
बोरस्तेंची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:34 AM
नाशिक : शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी शहरासाठी दोन महानगरप्रमुखांची नेमणूक करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. माजी नगरसेवक सचिन मराठे व महेश बडवे या दोघांवर शहराची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेअंतर्गत करण्यात आलेल्या या नेतृत्वाबदलाविषयी सैनिकांमध्ये उलट सुलट चर्चा केली जात असून, महानगरप्रमुखाप्रमाणेच जिल्हा प्रमुखाबाबतही लवकरच बदल होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
ठळक मुद्देशिवसेनेत खांदेपालट : मराठे, बडवे यांना संधीदोघांवर शहराची जबाबदारी