नाशिकरोड : जेलरोड येथील हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा उपनगर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन त्याला कुटुंबीयाच्या स्वाधीन केले. जेलरोड पिंटो कॉलनी येथे अल्पवयीन मुलगा नीरज संतोष टिळे हा सिक्रेट हार्टहायस्कूलमध्ये ९वीच्या वर्गात शिकत आहे. घरी शाळेत जातो असे सांगून सोमवारी सायकलवर घराबाहेर पडला. मात्र तो पुन्हा घरी न आल्याने याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरजचे वडील मंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत. निरज घरी न आल्याने उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक प्रवीण बाकले, कॉन्स्टेबल दिनेश महाजन यांनी अत्यंत गांभीर्याने सोशल मीडियाची मदत घेत तपासाची चक्रे फिरविली. बाकले यांनी जेलरोड मार्गावरील हॉटेल, चायनीज दुकान आदी ठिकाणी त्याचा शोध घेतला. तसेच नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता निरज हा रेल्वेने मनमाडच्या दिशेने गेल्याचे उघडकीस आले. बुधवारी बाकले व पोलीस कर्मचारी निरज याचा सर्वत्र शोध घेत असताना तो रेल्वेने नाशिकरोडला आल्याचे पोलिसांना समजले. घरात होणाºया किरकोळ वाद-विवादामुळे निरज त्रस्त झाला होता. तो श्रीश्री रविशंकर यांना गुरू मानतो. मन:शांतीसाठी मनमाड येथील श्रीश्री रविशंकर यांच्या आश्रमात गेल्याचे निरज याने पोलिसांना सांगितले.
हरवलेला अल्पवयीन मुलगा अखेर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:45 AM