शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

ब्रह्माकुमारी वासंती दीदी अमृत महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 12:00 AM

येवला : येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात नाशिक जिल्हा उपक्षेत्रीय संचालिका वासंती दीदी यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देवासंती दीदी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ईश्वरीय सेवेत संपूर्ण समर्पित झाल्या.

येवला : येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात नाशिक जिल्हा उपक्षेत्रीय संचालिका वासंती दीदी यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वासंती दीदी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ईश्वरीय सेवेत संपूर्ण समर्पित झाल्या. गेल्या ५० वर्षांत त्यांनी कुंभमेळ्यातील आध्यात्मिक मेळा, विश्वशांती वर्ष, महिला वर्ष, युवा वर्ष, विश्व योग दिन तसेच सायकल यात्रा, मोटरसायकल रॅली, महिला संमेलन, धर्म संमेलन, व्यसनमुक्ती अभियान तणावमुक्त जीवन यासारखे असंख्य उपक्रम यशस्वीपणे राबविले.तसेच ब्रह्माकुमारी संस्थेच्या एज्युकेशन विंग व यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांच्या जोडीने बनविलेला यश ब्रह्मा प्रोजेक्टही नाशिकमध्ये यशस्वीरीत्या राबविला आहे.सोहळ्यात माजी आमदार मारुतीराव पवार, सरला दीदी, गोदावरी दीदी आदींनी त्यांचा सत्कार केला.यावेळी वासंती दीदी यांना नारी शक्ती अवॉर्ड, बनकर पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे विशेष आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार, अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आध्यात्मिक योगदानासाठी विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध संस्था व संघटनांच्या वतीने यावेळी वासंती दीदी यांना स्मृतिचिन्ह व पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.नगरसेवक प्रवीण बनकर, सलीम काझी, राजेंद्र खेरुड, अश्विनी गंगापूरकर, स्मिता चांदवडकर, मीनाक्षी चांदवडकर, विकी बीवाल आदींनी यावेळी मनोगत केले. प्रा. सीताराम निकुंभ यांनी प्रास्ताविक तर नीता दीदी यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन कोपरगाव येथील संचालिका ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी केले. कार्यक्रमास ब्रह्माकुमारी साधक उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाSocialसामाजिक