ब्राह्मणगाव : येथील सटाणा-मालेगाव रस्त्यावर श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूलजवळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पालकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. सोमवारी मालेगावकडून येणाºया दुचाकीने विद्यालयाजवळून जाणाºया सौरभ संतोष मोहिते या सहावीच्या विद्यार्थ्याला जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे विद्यार्थी व पालक विद्यालयाजवळ त्वरित गतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. याबाबत माजी सरपंच सुभाष अहिरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भुसारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी, ‘गतिरोधक होणार नाही, तुमच्याने जे होणार असेल ते करा’ अशी अरेरावीची भाषा केल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत सटाणा-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक अडवून धरली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुख्याध्यापकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा पत्र पाठवून गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे सतत दुर्लक्ष केले. सोमवारी झालेल्या अपघातानंतर पालकांनी संताप व्यक्त करत मंगळवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको केला. सटाणा-मालेगाव रस्त्यावर अवजड वाहने व अन्य वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून, विद्यार्थ्यांना व पायी जाणाºया नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने येथे गतिरोधक टाकणे व सूचना फलक लावणे गरजेचे आहे. याप्रसंगी मविप्रचे उपसभापती राघोनाना अहिरे, बाजार समितीचे संचालक किरण अहिरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे, विलास अहिरे, विश्वास अहिरे, निंबा अहिरे, संजय अहिरे, सागर अहिरे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.गतिरोधक टाकण्याचे आश्वासनसंबंधित अधिकारी जोपर्यंत येत नाही व गतिरोधक टाकण्याची कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता. सटाणा पोलिसांना घटनेची माहिती होताच पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पालकांशी चर्चा केली. विद्यालयाजवळ आजच्या आज गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ब्राह्मणगाव : अपघातानंतर संतप्त प्रतिक्रिया; गतिरोधक टाकण्याची मागणी सटाणा-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:46 AM
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर स्कूलजवळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी पालकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती.
ठळक मुद्देगतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी रस्त्यावरपत्र पाठवून गतिरोधक टाकण्याची मागणी