नाशिक : महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबराेबर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अन्य मान्यवरांचाही गौरव शनिवारी (दि.५) करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आंबेकर यांच्या नाव दरवाजा येथील पाराशर वाडा येथील निवासस्थानी दुपारी चार वाजता हा सन्मान सोहळा हाेणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य तथा सचिव रवींद्र पैठणे गुरुजी यांनी ही माहिती दिली. आंबेकर हे गेल्या ४३ वर्षांपासून अग्निहोत्राची अविरत सेवा करीत आहेत. त्यांना २१ हजार रूपयांची गुरूदक्षिणा, मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गाेखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य राम कुलकर्णी, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
‘वेदविद्या’तर्फे आज आंबेकर यांना ब्रह्मरत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 1:01 AM