नाशिक : गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास संंचलित व्यंकटेश बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव आणि पद्मावती मंदिराच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. हा ब्रह्मोत्सव २९ सप्टेंबरपासून तर १३ आॅक्टोबरपर्यंत मंदिरात सुरू राहणार आहे.मंदिराच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. रविवारी विश्वस्त निशिगंधा व राजाभाऊ मोगल यांच्या हस्ते शुभारंभ महापूजा व ध्वजपूजन करण्यात येईल. तसेच ३० सप्टेंबरला वृषाली लेले व रमा कुकनूर यांचे भरत नाट्यम सादर होणार आहे. १ आॅक्टोबरला सामूहिक तुलसी अर्चना होईल. २ आॅक्टोबरला संदीप आपटे यांचे भूपाळी अभंगवाणी, ३ आॅक्टोबरला गिरीश वडनेरकर यांच्या हस्ते महालक्ष्मी महावस्त्र अर्पण सोहळा साजरा होईल. ४ आॅक्टोबरला पुरुषोत्तम कलंत्री यांच्या हस्ते हिरण्यअर्चना तर रवींद्र जोशी यांच्या वेणूवादनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ आॅक्टोबरला हेमंत बक्षी यांच्या उपस्थितीत बालाजी विवाह, ६ आॅक्टोबरला दीपा मोनानी-बक्षी यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर होईल. तसेच ७ आॅक्टोबरला सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पठण, ८ आॅक्टोबरला धामणकर भगिनी व संदेशकुमार राव यांच्या हस्ते महापूजा ९ आॅक्टोबरला डॉ. मोरेश्वर गोसावी यांच्या हस्ते महापूजा व अवभृत स्थान होईल. १० आॅक्टोबरला सामूहिक अक्षता अर्चना व राहुल भावे यांच्याकडून भंडारा तर सुंदरकांड सत्संग समितीकडून सुंदरकाड पठन होईल.११ व १२ आॅक्टोबरला महापूजा तर १३ आॅक्टोबरला कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रमोद भार्गवे यांच्या हस्ते महापूजा व गरुड पूजन होईल तर विजय सिनकर यांच्याकडून दुग्धपानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम रोज पहाटे ५ वाजेपासून तर सकाळी ९ वाजेपर्यंत होणार आहेत. या उत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकणी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, राजाराम मोगल, आनंद जोशी, अशोक खोडके यांनी केले आहे.
रविवारपासून बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:53 PM