सिन्नर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीमध्ये औद्योगिक वसाहती बंद असल्या तरी विजेचा पुरवठा योग्य त्या रीतीने शेतीला होत नसल्याच्या तक्रारी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आमदार कोकाटे यांनी महावितरण, पारेषण व समृद्धीच्या अधिकाऱ्यांसोबत विजेच्या पायाभूत सुविधांबाबत बैठक घेतली.या बैठकीत सिन्नर-१, सिन्नर-२ तसेच टाकेद विभागातील विजेची सद्यस्थिती व त्यावर उपाययोजना यावर सखोल चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी काही नवीन वीजकेंद्र प्रस्तावित करण्याबाबत कोकाटे यांनी सूचना दिल्या. सर्व तालुक्यातील १३२ केव्हीचे सर्व वीजकेंद्र चार्ज करण्यासाठी एक २२० केव्ही वीजकेंद्र होणे आवश्यक आहे. आडवाडी येथे २२० केव्ही वीज केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्याबाबत काम मार्गी लावू, असे कोकाटे यांनी सांगितले.--------------------------------नवीन वीज उपकेंद्राबाबत सूचनाविंचूर दळवी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्र नवीन प्रस्तावित करावे व त्याचबरोबर टाकेद गटातदेखील मध्यवर्ती ठिकाणी नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्याच्या सूचना यावेळी कोकाटे यांनी दिल्या. पांढुर्ली, साकूर व परदेशवाडी या उपकेंद्रांतून पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसून ते अद्ययावत करून त्यांची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले. समृद्धीच्या कामासाठी सुजलोनच्या खापराळे येथील केंद्रातून एक्सप्रेस फिडर जोडण्याची मागणी आहे. हे फीडर जोडले गेल्यावर किमान दोन वर्षे टाकेद गटातील व पश्चिम भागातील विजेच्या दाबाचा प्रश्न बहुतांशी मार्गी लागणार आहे.
विजेच्या पायाभूत सोयी-सुविधांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:33 PM