शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

जीएसटी विवरण भरण्यास आॅनलाइनमुळे ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:19 AM

जीएसटीची विवरणपत्रे विहित मुदतीत न भरल्यास व्यापाºयांना दोनशे रुपये प्रति दिन दंडाची तरतूद शासनाने केली खरी; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जीएसटीचे विवरण आॅनलाइनवर अपलोडच होत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. सदोष आॅनलाइन व्यवस्था असताना त्यात सुधारणा करणे सोडून दंडाची टांगती तलवार करदात्यांवरच ठेवण्याच्या प्रकारामुळे व्यापारी आणि सनदी लेखापाल तसेच कर सल्लागार त्रस्त झाले असून, त्यांनी शुक्रवारी थेट जीएसटी कार्यालावरच धडक दिली.

नाशिक : जीएसटीची विवरणपत्रे विहित मुदतीत न भरल्यास व्यापाºयांना दोनशे रुपये प्रति दिन दंडाची तरतूद शासनाने केली खरी; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जीएसटीचे विवरण आॅनलाइनवर अपलोडच होत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. सदोष आॅनलाइन व्यवस्था असताना त्यात सुधारणा करणे सोडून दंडाची टांगती तलवार करदात्यांवरच ठेवण्याच्या प्रकारामुळे व्यापारी आणि सनदी लेखापाल तसेच कर सल्लागार त्रस्त झाले असून, त्यांनी शुक्रवारी थेट जीएसटी कार्यालावरच धडक दिली.केंद्र सरकारने जीएसटीअंतर्गत तीन विवरण पत्रे (जीएसटी आर-१, २ व ३ बी) भरणे बंधनकारक केले आहेत; मात्र ही विवरणपत्रे भरण्यासाठी सरकारची आॅनलाइन प्रणालीच सक्षम नाही. विवरणपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (दि. १०) असून, त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करूनही सदोष युटिलिटीमुळे विवरणच दाखल होऊ शकत नाही. युुटिलिटीमध्ये शासन वारंवार बदल करीत असून, त्यामुळे सक्षम युटिलिटी देण्यात शासन असमर्थ ठरत आहे. शुक्रवारी नवीन युटिलिटी देण्यात आली असून, त्यातही जीएसटी १ हे विवरणपत्र दाखल करता येऊ शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे शुक्रवारी चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटकडून अध्यक्ष विकास हासे, माजी अध्यक्ष रवि राठी, सचिव रोहन आंधळे, कर सल्लागार जयप्रकाश गिरासे, चेंबर आॅफ कॉमर्सचे सतीश बूब अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जीएसटी कार्यालयावर धडक देऊन शासनाच्या गोंधळी कारभारावर आक्षेप नोंदवला. जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त चित्रा कुलकर्णी, सहआयुक्त हेमल बाखरे यांच्याशी चर्चा करताना शासनाने आधी आॅनलाइन प्रणाली सक्षम करावी, मगच विवरणपत्रे मुदतीत भरण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. त्यावर वरिष्ठांना ईमेलद्वारे परिस्थिती अवगत करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.