सध्या भाजीपाला वर्गातील कोबी, मिरची, टमाटे पाठोपाठ आता कांद्याचेही भाव घसरणे दररोज सुरू असून कोबीवर तर अस्मानी संकट उभे राहिले आहे. गेल्या वर्षी कोबीला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी कोबीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून आधीच पाऊस नाही, त्यात कोबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बरेच नुकसान केले आहे. तरीदेखील शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन पीक वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र बाजारात कोबी घेण्यासाठी कोणीच तयार नसल्याने शेवटी कंटाळून अरुण अहिरे या शेतकऱ्याने त्यांच्या रानमळा शिवारातील सात एकर लागवड केलेल्या कोबीवर स्वत: ट्रॅक्टरचा रोटर फिरविला आहे.
अजून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे टमाटे, मिरची, सिमला मिरची शेतात तयार असून त्यांनाही भाव नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
एक एकर कोबी लागवड करतांना त्यास कोबीचे महागडे बियाणे, त्याच्या लागवडीसाठी होणारे अन्य खर्च , फवारणीसाठी लागणारी महागडी औषधे ,मजुरी हे सर्व पाहता एकरी एक लाख रुपये खर्च येतो. मात्र सर्वत्र कोबीची आवक, बाजारभाव, मागणी नसल्याने शेतातच माल बऱ्याच ठिकाणी पडून आहे. व्यापारीही उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पुन्हा मूळ हक्काचे पीक म्हणून कांदा पिकाकडे पहिले जाते. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात दररोज होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शेती व प्रपंच चालविण्यासाठी मोठी अडचण येणार असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे.
फोटो - २६ ब्राम्हणगाव १
ब्राम्हणगावातील रानमळा शिवारात कोबी पिकावर ट्रॅक्टरचा राेटर फिरविताना शेतकरी अरुण अहिरे.
260821\26nsk_14_26082021_13.jpg
ब्राम्हणगावातील रानमळा शिवारात कोबी पिकावर ट्रॅक्टरचा राेटर फिरविताना शेतकरी अरुण अहिरे.