शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

रस्त्यांच्या कामाचे पितळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:49 PM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांना समज दिली आहे. यासंदर्भात राज्य रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार केली आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास साधला जाणार आहे असे बोललं जातं आहे. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे, तर दुसरीकडे गावांना जोडणारे रस्ते खराब होत आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात गावांना जोडणाºया रस्त्यांची दुरदशा चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास हा खेडे गावाला जोडणाºया रस्त्यांमुळे होत असतो; परंतु सध्या या रस्त्यांचे हाल झाले आहे. शहरांना समृद्धीमुळे विकास होणार आहे तर खेडे मात्र विकासापासून दूर जात आहे असं तरी सध्या चित्र आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना पावसाळ्यात या रस्त्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. उन्हाळ्यात अवजड वाहनांमुळे ुधुळीचा त्रास सहन करावा लागला. आता तर रस्ते अति खराब झाल्याने वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. समृद्धी महामार्ग या रस्त्याची रुंदी चारशे फूट असून, त्यावर मातीचा भराव टाकण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदारांकडून शिवारअंतर्गत रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. २० ते २५ टनी डंपर वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहे. नुकताच नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या पाथरे ते शहा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साधारण पणे तीन किलोमीटरच्या रस्त्याची सततच्या जड वाहनांमुळे खडी, डांबर, साईडपट्ट्या उखडून गेल्या आहे. ज्यादा क्षमतेच्या वाहतुकीमुळे शिवाररस्त्यांसह अन्य इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची देखील वाट लागली आहे. त्यात पाथरे ते बहादरवाडी, जवळके, सायाळे या रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी, अथवा चार चाकी वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक