----
शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील वडनेर शिवारात नाल्याच्या कामावरून शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश भगवान जाधव या शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. जाधव हे त्यांच्या शेताजवळील नाला कोरत असताना, संजय अर्जुन जाधव, किरण संजय जाधव, राजेंद्र संजय जाधव यांनी किरकोळ कुरापत काढून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार व्यापारे करीत आहेत.
----
पत्नीने केला पतीवर कटरने हल्ला
मालेगाव : शहरातील फतेह मैदान परिसरात राहणाऱ्या मोहंमद अमीन अब्दुल रहीम याच्यावर कटरने वार करून जखमी करणाऱ्या हिना कौसर सलीम अली या महिलेविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहंमद अमीन यांनी लग्नाचे नाते तोडण्यावरून पती-पत्नीत भांडण झाले. यावेळी पत्नीने कटरने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मोरे हे करीत आहेत.
----
घरगुती वादातून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील लोणवाडे येथे घरगुती वादातून एका जणाला मारहाण करणाऱ्या ६ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ईश्वर निंबा उशिरे यांनी फिर्याद दिली आहे. घरगुती वादातून अरुण दयाराम वाघ, भावराव सोनू वाघ, संदीप दयाराम वाघ, सागर भावराव वाघ, आधार शिवराम वाघ, दयाराम सोनू वाघ आदींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बच्छाव करीत आहेत.
-----
आयेशानगर भागात घरफोडी
मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी एतेयाज अहमद सलीम अहमद यांनी फिर्याद दिली आहे. एतेयाज अहमद यांच्या घराचे गच्चीवरील दरवाजातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील ३५ हजार रुपये रोख व ३४ हजार रुपयांचे सोने असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पुढील तपास हवालदार सय्यद करीत आहेत.
------
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे शिवारात कार क्रमांक एमएच १५ जीएफ ३२२१ वरील चालकाने पुढे चालणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच १५ जीडी ७६८२ हिला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक पराग चंद्रकांत जेठवा (२७) रा. त्रिमूर्ती चौक याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संदीप राजेंद्र मकवाना यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत.
---