शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धाडसी झुंज : एक हात बिबट्याच्या जबड्यात तरीही चिमुकला थेट भिडला बिबट्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 3:03 PM

बुधवारी सकाळी त्वरित पिंजरा लावण्यात आला आहे. सोनारी शिवारात असलेली उसाची शेती अन‌् दारणेचे खोरे यामुळे या भागात बिबट्याचा वावर आहेच,

ठळक मुद्देदुसऱ्या हाताने मानेवर मारले बुक्केसोनारीत पहिलीच घटना

नाशिक : वेळ दुपारी साडेतीन वाजेची... ठिकाण सोनांबेजवळील सोनारी गाव... मक्याच्या शेतात काळुंगे वस्तीवर नेहमीप्रमाणे मक्याची कणसे खुडायचे काम सुरु... काही समजायच्या आत चिमुकल्या गौरवच्या डोळ्यांपुढे बिबट्या येतो... गौरव तेथून पळणार तोच बिबबट्याने झडप घालतो अन त्याचा उजवा हात जबड्यात घेतो... गौरव घाबरला मात्र त्याने धाडसाने आक्रमक बिबट्याशी झुंज देत त्याचा हल्ला परतून लावला अन‌् सुदैवाने त्याला यशही आले.

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली -घोटी रस्त्यालगत असलेल्या सोनांबे गावालगतच्या सोनारी या लहानशा गावात संजय काळुंगे यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतात मशागतीची कामे सुरु होती. शाळांना सध्या सुटी असल्याने संपुणे कुटुंब शेतीवरच होते. काही महिला, पुरुष शेतमजूर सोंगणी करत होते तर काही मक्याची कणसे खुडत होती. यावेळी जनता विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणारा गौरव काळुंगे हा शाळकरी मुलगाही कणसे तोडून पाटीमध्ये टाकत होता. याचवेळी अचानकपणे शेतातील दुसऱ्या बाजूने त्याच्या समोरुन भला मोठ्या बिबट्या आला. साहजिकच गौरवदेखील बिबट्याला डोळ्यांपुढे काही फुटांवर बघून घाबरला. यावेळी तो शेतातून बाहेर जाणारच तेवढ्यात बिबट्याने झडप घेत त्याचा उजवा हात जबड्यात घेतला; मात्र हा पठ्ठयाही घाबरला नाही, त्याने दुसऱ्या हाताने बिबट्याच्या मानेला जोरजोराने बुक्के मारण्यास सुरुवात केली, त्यामुळे बिबट्याने जबड्यात घेतलेला गौरवचा हात सोडून पळ काढला आणि गौरवने दाखविलेल्या धाडसामुळे त्याचा प्रतिकार यशस्वी झाला. यावेळी त्याच्या आवाजाने आजुबाजुचे शेतमजूर, त्याचे वडील संजय, काका सोनांबेचे पोलीस पाटील चंद्रभान पवार आदींनी धाव घेतली. यावेळी रक्तबंबाळ झालेला गौरवचा हात बघून घरातील महिलाही भेदरल्या. त्यास तत्काळ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल. बुधवारी (दि.४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गौरवला डिस्चार्जही देण्यात आला.सोनारीत पहिलीच घटनासोनारी भागात बिबट्याचे दर्शन झाले आहेत, मात्र हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने गावात काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले अहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल पंढरीनाथ आगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच बुधवारी सकाळी त्वरित पिंजरा लावण्यात आला आहे. सोनारी शिवारात असलेली उसाची शेती अन‌् दारणेचे खोरे यामुळे या भागात बिबट्याचा वावर आहेच, नागरिकांनी खबरदारी घेत शेतीची कामे करावी व वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागNashikनाशिकwildlifeवन्यजीवAccidentअपघात