नांदगाव : तालुक्यातील ढेकु बु येथील शिंदे वस्तीवर चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास रामचंद्र रायभाण गायके यांच्या शेतातील घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करु न सोने,चांदिचे दागिने, नविन कपडे आणि रोख रक्कम २८ हजार असे सर्व मिळून ८० हजार रुपयांची चोरी झाली. ढेकु बु येथील रामचंद्र गायके हे आपल्या शेतात बांधलेल्या नविन घरात पत्नी जिजाबाई, मुलगा, बाबासाहेब, सुन वैशाली आणि तीन नातवंडासह रहातात. त्यांचा येथे शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेली एक तोळा सोण्याची पोत, चांदीचे जोडवे एक जोड, चांदीचे हातात घालण्याचे कडे एक जोड, व त्यांना स्वत:ला नाशिक येथे दवाखान्यात जाण्यासाठी घरात ठेवलेले रोख रक्कम २८ हजार रु पये तसेच तिसरी मुलगी योगिता काळे रा.रेडगाव, ता.चांदवड हिचे नविन आकरा हजार रु पये किमतीचे महावस्त्र, घरातील नविन सड्यावर डल्ला मारु न पसार झाले. चोरांनी जातेवेळी घरातील आल्फा कंपनीच्या दोन सुटकेस येथून साधारण एक हजार फुट असलेल्या गणेश बाबुराव शिंदे यांच्या शेतातील बांधावर सापडल्या. सदर घटनेबाबत चोरट्यांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाईदास मालचे, पोलीस हवालदार सुनिल वटाने आणी काँनस्टेबल अनिल गांगुर्डे, अनिल शेरेकर हे करत आहेत.
नांदगाव तालुक्यात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 2:20 PM