लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस चौकीतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात सापडले होते. तसेच उपनगर पोलीस ठाणे अंकित नारायणबापूनगर पोलीस चौकीत एक कर्मचारी लाचेची रक्कम घेताना जाळ्यात अडकला होता. मागील वर्षी जिल्ह्यात नऊ, तर नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत २४ पोलीस लाचेची रक्कम स्वीकारताना जाळ्यात अडकले होते.
कोरोनामुळे पोलीस दलात जरी लाचखोरीला ब्रेक लागला असला तरी महसूल खात्याची मात्र यावर्षीही आघाडी कायम आहे.
---इन्फो--
पाच ते वीस हजारांपर्यंत लाच
मागितले २५ अन् घेतले १३ हजार
पोलिसांकडून पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत पोलिसांकडून लाचेची रक्कम मागितली गेली आहे. सातपूरच्या त्या तीन पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडअंती १३ हजारांची रक्कम स्वीकारली होती.
--इन्फो---
लाच मागितली जात असेल तर येथे संपर्क साधा :
शासकीय कार्यालयांमध्ये लोकसेवकांकडून कुठल्याही कामाकरिता विविध कारणे देत पैशांची मागणी केली जात असेल तर थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात (०२५३-२५७५६२८ किंवा टोल-फ्री १०६४) विनासंकोच संपर्क साधावा. निर्भीडपणे नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
---इन्फो---