शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:15 AM

धनोली धरणाचे गेट तोडल्यामुळे पाटाद्वारे वाहू लागलेले पाणी. पाळे खुर्द : महाराष्टÑात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता ...

ठळक मुद्देकळवण तालुक्यातील घटना  दळवटच्या चौघांना अटक; गुन्हा दाखल

धनोली धरणाचे गेट तोडल्यामुळे पाटाद्वारे वाहू लागलेले पाणी.पाळे खुर्द : महाराष्टÑात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याची घटना घडली असून, त्यामुळे धरणातील सुमारे सात ते आठ दशलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे. धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी लोक आता कोणत्या स्तराला चालले आहेत, याचे हे उदाहरण ठरावे. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. शेतकºयांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार इसम संशयास्पद स्थितीत आढळले. शेतकºयांनी संबंधित इसमांना पकडले आणि धनोली गावातील मंदिरात कोंडून ठेवले. या इसमांनी चौकशी केली असता ते चौघेही दळवट येथील रहिवासी असल्याचे समोर आले. ही बातमी पसरताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची कुणकुण प्रशासकीय यंत्रणेला लागताच संपूर्ण यंत्रणा धनोली गावात रात्री ९ वाजेच्या सुमारास हजर झाली. कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्यासह अभोणा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान धरणाचे गेट तोडणारे दळवट येथील प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५) आणि सुभाष येवाजी पवार (६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.शेतकºयांचे लाखोंचे नुकसानया घटनेने आदिवासी शेतकरी अंबादास गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, सुखराम पवार, किसन वाघ, भास्कर दळवी यांसह अनेक शेतकºयांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सुमारे तीनशे क्विंटल कांदा वाहून गेला आहे. तसेच शेतात साठविलेला जवळपास दीडशे क्विंटल कांदा भिजला आहे. शेतात उभ्या असलेल्या मिरची, कोथिंबीर, उन्हाळी बाजरी व वालपापडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी