सुरगाणा : सुरगाणा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या ४८ तासात तांत्रिक बिघाड झाल्याने ४० तासांपेक्षा जास्त वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सुरगाणा तालुक्याचा विद्युत पुरवठा स्वतंत्र विद्युत वाहिनीवरून केला जावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे.तालुक्यासाठी दिंडोरी येथून ज्या विद्युतवाहिनीने पुरवठा केला जातो, त्याच वाहिनीवरून दिंडोरी तालुक्यातील कोशिंबासह परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जात आहे. कोशिंबा येथे एकाच विद्युत खांब्यावर कोशिंबासह तेथील परिसर आणि सुरगाणा तालुक्याचा विद्युत पुरवठा एकत्रितपणे तेथील ठेवण्यात आला आहे. पावसामुळे वादळामुळे जेव्हा कोशिंबा व दिंडोरी दरम्यान विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्या परिणामी संपूर्ण सुरगाणा तालुक्याचा विद्युत प्रवाह खंडित होतो. मोठा कालावधी विद्युतप्रवाह म्हणजे तब्बल ४० तासांपेक्षा जास्त यात भारनियमनाचे तास धरून खंडित राहिला होता. मध्यंतरी दोन-तीन वेळा विद्युतप्रवाह सुरू झाला. पण फार काळ तो राहिला नाही. सततच्या खंडित होणार्या विजपुरवठ्यामुळे सर्वच ठिकाणच्या वीज कर्मचारींची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. सुरगाणा तालुक्यासाठी स्वतंत्र विद्युतवाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.आज सकाळी सुरगाणा येथे काही भागात विद्युत पुरवठा सुरू होता. तर काही भागात विद्युत पुरवठा करणार्या तारांवर झाडाच्या फांद्या पडून तारा तुटल्याने दिवसभर विद्युतपुरवठा खंडित राहिला होता.
सुरगाण्यात पावसामुळे वीज पुरवठा खंडित
By admin | Published: May 18, 2014 11:30 PM