शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

दरवाढीला ब्रेक : कांदा विक्रेत्यांचा भ्रमनिरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 11:00 PM

उमराणे : गेल्या आठवड्यात उन्हाळी कांदा दरात तब्बल तीनशे ते पाचशे रुपयांची झालेली अनपेक्षित वाढ त्याच आठवड्यापुरती मर्यादित राहिल्याने कांदा विक्रेते, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मागील आठवड्यात १,८०० रुपयांवरून २,३०० रुपयांपर्यंत उसळी घेतलेल्या कांद्याचा दर चालू आठवड्यात २,५०० रुपयांपर्यंत होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

ठळक मुद्देमागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याचा परिणाम

उमराणे : गेल्या आठवड्यात उन्हाळी कांदा दरात तब्बल तीनशे ते पाचशे रुपयांची झालेली अनपेक्षित वाढ त्याच आठवड्यापुरती मर्यादित राहिल्याने कांदा विक्रेते, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मागील आठवड्यात १,८०० रुपयांवरून २,३०० रुपयांपर्यंत उसळी घेतलेल्या कांद्याचा दर चालू आठवड्यात २,५०० रुपयांपर्यंत होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे.पंधरा दिवसांपूर्वी उन्हाळी कांद्याचा दर घसरुन १,५०० रुपयांपर्यंत आला होता. या काळात एकीकडे चाळीत साठवणूक केलेला कांदा माल खराब होत असतानाच बाजारभाव अजून कमी होतील की काय, या भीतीपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला होता. परिणामी बाजारात आवक वाढली होती.तर दुसरीकडे मिळत असलेला बाजारभाव बघता कांदा उत्पादनापासून मिळणारा नफा तर दूरच, परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हात आखडता घेतला होता. त्यामुळे मागील आठवड्यात आवकवर याचा परिणाम झाल्याने बाजारभावात तब्बल ३०० ते ५०० रुपयांची अनपेक्षित वाढ झाली होती.अचानक वाढलेल्या बाजारभावामुळे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव चालू आठवड्यात अजून वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती. त्यामुळे उमराणे बाजार समितीत सोमवारी (दि. २७) कांदा आवकेत वाढ झाली होती. मात्र, बाजारभाव वाढण्याऐवजी सरासरी दरात २०० ते ३०० रुपयांची घसरण झाल्याने कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ सद्यस्थितीत कमी प्रमाणात कांदा शिल्लक असून, तोही खराब होत आहे. त्यामुळे कांदा विक्री करावा की नाही, याबाबत सभ्रंमावस्था निर्माण झाली आहे.दरम्यान, स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८३ ट्रॅक्टर, २०४ पिकअप आदी वाहनांतून सुमारे १२ ते १३ हजार क्विंटल कांदा आवक झाल्याचा अंदाज आहे. बाजारभाव कमीत कमी ८०० रुपये, तर जास्तीत जास्त २२०० रुपये, तर १८०० रुपये सरासरी दराने कांदा विक्री झाला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा