मतदारांनी उत्साह दाखवत सकाळी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदान केंद्राबाहेर उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी दिसत होती. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढली. येथील कर्मवीर विद्यालयाच्या इमारतीत व जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र होते. वार्ड क्र.२ मध्ये दुपारी उमेदवार राजेंद्र म्हसकर यांच्या नावासमोरील बटण दोन-तीन वेळेस दाबले, तरी मतदान होत नसल्याने सुमारे एक तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती. याबाबत म्हसकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. गावगाडा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गटा-तटात चुरस असल्याने सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. मतदान क्रमांक व बुथ क्रमांक शोधण्यासाठी मतदारांची धावपळ उडताना दिसून आली. पोलिसांनी आपल्या ताफ्यासह मतदान केंद्रावर चोख बंदोबस्तात सेवा पुरविली
मशीनमध्ये बिघाड; प्रक्रिया लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 9:07 PM
विंचूर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) सायंकाळपर्यंत ७१ टक्के मतदान झाले. १०,१७२ पैकी ७,२२९ मतदारांनी हक्क बजावला.
ठळक मुद्दे विंचूरला ७१ टक्के मतदान : केंद्राबाहेर गर्दी