शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी सिद्धार्थ नगरमधील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळांची, पायपांची व तोट्यांची आठ ते दहा ठिकाणी तोडफोड केली. त्यामुळे येथील नागरिकांना दुसऱ्या दिवशी पाणी मिळू शकले नाही. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ होलीन, सागर जाधव यांना नागरिकांनी दिली. सदर नुकसानीची पाहणी करून त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, पंचायत समिती सदस्य विजय जगताप यांच्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये हे समाजविघातक कृत्य करणारा समाजकंटक कैद झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित समाजकंटकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सदर सीसीटीव्ही फूटेज नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना देण्यात आले असून, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोट===
नागरिकांच्या प्राथमिक सुविधा म्हणून सिद्धार्थनगरमध्ये ठिकठिकाणी स्टँडपोस्ट उभारून नळ दिले आहेत. मात्र काही राजकीय विरोधकांनी मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने सदरचे कृत्य केले आहे. पोलिसांनी समाजकंटकांचा शोध घेऊन कठोर शासन करावे.
- मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे.
(फोटो ०९ नळ)