शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

लाचखोर अभियंत्यांकडे ३५ तोळे सोन्यासह पाच लाखांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:15 AM

लाचलुचपत विभाग : स्थावर मालमत्तेचा शोध; तीन पथकांकडून चौकशी नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदारास कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ १२) रंगेहाथ पकडले़ या तिघांच्या घरझडतीत लाचलुचपत विभागाच्या हाती सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाख रुपयांची रोकड लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, तपासी अधिकाºयांची तपासाची गती पाहता त्यांच्यावर राजकीय दबाब असल्याची चर्चा आहे़

लाचलुचपत विभाग : स्थावर मालमत्तेचा शोध; तीन पथकांकडून चौकशी

नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदारास कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ १२) रंगेहाथ पकडले़ या तिघांच्या घरझडतीत लाचलुचपत विभागाच्या हाती सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाख रुपयांची रोकड लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, तपासी अधिकाºयांची तपासाची गती पाहता त्यांच्यावर राजकीय दबाब असल्याची चर्चा आहे़शासकीय ठेकेदार मोहिते यांनी रस्ता दुरुस्तीसाठी निविदा भरलेली होती़ त्यानुसार रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहिते यांना पैसे अदा करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती़ याबाबत मोहिते यांनीनाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मोहिते यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून शुक्रवारी (दि़१३) सापळा रचला़ त्यानुसार कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांनी मोहिते यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांचे मूळ चलन व १ लाख रुपयांचे नकली चलन) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण उपविभाग) कार्यालयात स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर ही रक्कम कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार व सहायक अभियंता सचिन पाटील यांच्या निर्देशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली़ या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती़ तसेच शनिवारी न्यायालयात हजर केले असता मंगळवार (दि़१७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस कोठडीतील कालावधीत तिघाही अधिकाºयांच्या अपसंपदेच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत़ या पथकांनी आतापर्यंत सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाखांची रोकड शोधून काढली आहे़ तर स्थावर मालमत्तेचा शोध सुरू आहे़तपासाच्या कार्यपद्धतीबाबत साशंकतासार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांना २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती़ त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधीक्षक डॉ़ शशिकांत महावरकर व त्यांच्या टीमने मोठे घबाड शोधून काढले होते़ मात्र, सद्यस्थितीत तीन अभियंते गळाला लागूनही तपासातील प्रगतीबाबत माध्यमांना माहिती दिली जात नसल्याने कारवाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे़ तसेच या प्रकरणात पकडलेले कार्यकारी अभियंत्यांचे स्टाँग राजकीय वजन पाहता मंत्रालयातून दबाव येत असल्याची चर्चा आहे़सार्वजनिक बांधकाम विभागातील लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा अभियंत्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या आरोपींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या तीन पथकांनी आतापर्यंत या तिघांकडे सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाख रुपयांची रोकड शोधून काढली आहे़ तसेच स्थावर मालमत्तेचा शोध सुरू असून तपासाबाबत कोणताही राजकीय दबाव नाही़- प्रभाकर घाटगे, तपासी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक