कळवण : तालुक्यातील मोकभणगी महसूल मंडळाचे मंडल अधिकारी एम. एल. पवार यांना गुरुवारी (दि. १०) सकाळी कळवण तहसीलदार कार्यालय परिसरात शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पवार यांनी धनेर येथील महादू गायकवाड या आदिवासी शेतकऱ्याकडे सातबारा उताऱ्यातील नोंदीवरील बोजा कमी करण्यासाठी पाच हजाराची मागणी केली होती. महादू गायकवाड यांनी याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदविल्याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या यंत्रणेने कळवण तहसील आवारात सापळा रचला. तक्रारदार आदिवासी शेतकरी महादू गायकवाड यांच्याकडून मंडल अधिकारी पवार यांनी पाच हजाराची लाच घेताच यंत्रणेने त्यांना रंगेहाथ पकडले. (वार्ताहर)
लाचखोर मंडल अधिकारी अटकेत
By admin | Published: September 11, 2015 12:56 AM