लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे.कादवा नदीवरील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा पुल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून लखमापूर, कादवा कारखाना, वणी तसेच अन्य गावांना जाण्यासाठी म्हेळुस्केकरांना प्रवास करावा लागतो. परंतु पावसाळ्यात पुर आणि सतत प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक, प्रवासी वर्गाची कायम वर्दळ या पुलाला आजारपण प्राप्त करणारी ठरली होती.या पुलावर अत्यंत मधोमध मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवासी वर्गाला या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पावसाळ्यात कादवा नदीला करजंवण धरणांचे पाणी कायम सोडले जात असल्याने ह्या पुलाला पुराचे पाणी कायम लागलेले असते. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणारे विद्यार्थी अनेक संकटांना तोंड देऊन या पुलावरून प्रवास करीत आहेत.अनेक वेळा निवेदन देऊन ही या पुलांच्या समस्यांकडे कोणीही लक्ष्य दिले नाही. खासदार भारती पवार, दिंडोरी तालुक्याचे आमदार नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य छाया गोतरणे यांना नवीन उपसरपंच योगेश बर्डे यांनी या पुलाची समस्या पहाण्यासाठी निमंत्रण दिले व पुलाचे आजार पण दुर झाले.म्हेळुस्के ग्रामपंचायतीने याकामी वेळोवेळी आता नव्याने पाठपुरावा केल्याने या पुलाला समस्या मुक्तीचा मार्ग मिळाला आहे. या कामी म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे, ग्रामपंचायत सदस्य, दत्तू शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष माधव शिंदे, हरी बर्डे, गोटीराम बर्डे, सुनील गांगुर्डे, मोनाली वायकांडे, पुनाबाई गांगोडे, राजेंद्र बर्डे, काळू बर्डे, संजय गांगोडे, शरद कराटे, भिकन महाराज वक्ते, शांताराम पगार, आण्णा पगार, नामदेव गांगोडे आदी उपस्थित होते.कोट...हा पुल प्रवासी वर्गाला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा पुल बायपास म्हणून ही काही वेळेस वापरला जातो. परंतु हा पुल वाहतुकीसाठी अत्यंत धशेक्याचा वाटू लागल्याने त्याच्या दुरुस्तीसाठक्ष वेळोवेळी दिलेल्या निवेदनांला केराची टोपली पाहावी लागली. परंतु म्हेळुस्के ग्रामपंचायतीने यासाठी आता पुढाकार घेऊन या पुलाचे काम हाती घेतल्याने तालुक्यातील जनतेसमोर एक विकास कामांचा आदर्श निर्माण केला आहे......योगेश बर्डे, उपसरपंच, म्हेळुस्के ता. दिंडोरी.
कादवा नदीवरील पुल दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 6:57 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे.
ठळक मुद्देलखमापूर : प्रवासी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण