जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज, पुरणगाव येथील विज्ञान शाखेचा निकाल नुकताच लागला. गुरुकुलाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुरुकुलातील प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण बारा विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह व एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.प्रथमेश प्रवीण आमले (९४ टक्के) प्रथम, गौरव रावसाहेब ठोंबरे (९३.१७ टक्के) व्दितीय, महेश लक्ष्मण शिंदे (९१.६७ टक्के) तृतीय, प्रतीक रमेश नाईक (९० टक्के) चतुर्थ, रोहित अनिल साळवे (८७.५० टक्के) पाचवा हे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. यासर्व विद्यार्थ्यांचे गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, रामभाऊ झांबरे, प्रकाश भामरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
आत्मा मालिक गुरुकुलाची उज्ज्वल परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 10:22 PM
जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज, पुरणगाव येथील विज्ञान शाखेचा निकाल नुकताच लागला. गुरुकुलाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुरुकुलातील प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण बारा विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह व एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
ठळक मुद्देबारा विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह व एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण