पेठ येथील हुतात्मा स्मारक येथे मुख्य कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांचे व हुतात्मा स्तंभाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, नगराध्यक्ष मनोज घोंगे, सभापती विलास अलबाड, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, शामराव गावीत, गिरीश गावीत, विशाल जाधव, याकूब शेख, रामदास वाघेरे, पुष्पा गवळी, नामदेव मोहांडकर, मोहन कामडी, मनोहर टोपले, चेतन खंबाईत ,गणेश गवळी, अशोक गवळी, भागवत पाटील, अरूणा वार्ड, लता सातपूते,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, यशोदिप संस्था, संकल्प संस्था, सोशल नेटवर्कींग फोरम,आदिवासी संघटना, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.राजेश भोये यांनी सुत्रसंचलन तर महेश टोपले यांनी आभार मानले.
पेठमध्ये क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 2:52 PM
पेठ : शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
ठळक मुद्देआदिवासी दिन उत्साहात :हुतात्मा स्तंभाचे पूजन