ठळक मुद्दे जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतींना उजाळा
लोकमत न्यूज नेटवर्कसौंदाणे : येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. एम. खैरनार होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी प्राचार्य वाय. आर. पवार, उपशिक्षक टी. वाय. पगार, प्रा. व्ही. एम. खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य के. डी. दाभाडे, पर्यवेक्षक एस. डी. वाघ, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. एस. हाके यांनी तर आभार पी. यु. जाधव यांनी मानले.