भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणा : ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:11 PM2020-01-27T23:11:30+5:302020-01-28T00:27:53+5:30

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

Bring Corrupt Officers On: Resolution | भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणा : ठराव

सिन्नर तालुका कॉँग्रेसच्या बैठकीत बोलताना तालुकाध्यक्ष विनायक सांगळे. समवेत युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे, मुजाहिद खतीब, मीना देशमुख, रत्नमाला मोकळ, उदय जाधव, अश्फाक शेख, भाऊसाहेब शेळके आदी.

Next
ठळक मुद्देसिन्नर : तालुका कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय

सिन्नर : तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
भ्रष्टाचारी अधिकाºयांमुळे सर्वसामान्य माणसांचे काम मार्गी लागणे मुश्कील झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा भ्रष्टाचारी अधिकाºयांचा बंदोबस्त जिल्हास्तरीय अधिकाºयांनी तत्काळ करावा, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या आशयाचे पत्र राज्याचे महसूलमंत्र्यांना पाठवण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
सिन्नर तालुक्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीमधील सर्व सदस्य बरखास्त करून नवीन सदस्यांची शिफारस बैठकीत करण्यात आली. प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुदाम सांगळे, राजाभाऊ गोळेसर यांच्यासह ज्येष्ठांना जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेण्यात यावे, अशी शिफारस यावेळी करण्यात आली. सिन्नर शहरांमध्ये पाण्याचे नियोजन कोलमडले असून, नगर परिषदेतील सत्ताधाºयांनी नियोजन करावे. आजी व माजी आमदारांनी मतभेद बाजूला ठेवून नगर परिषदेची पाणी योजना पूर्णत्वास नेऊन उपाययोजना करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मीना देशमुख, शहर महिला अध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका समन्वय उदय जाधव, अश्फाक शेख, सिन्नर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, जाकीर भाई शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकसानभरपाईची मागणी
अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने आदेश देऊनही व्यवस्थित पंचनामे न करता थातूरमातूर पद्धतीने सरकारला प्रस्ताव पाठविले आहेत. संपूर्ण शेतकºयांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नसून त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, असा ठरावही बैठकीत करण्यात
आला.

Web Title: Bring Corrupt Officers On: Resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.