सटाणा : भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या शासन यंत्रणेच्या निदशर्नास आणून देऊन त्या चव्हाट्यावर आणण्याचे काम करायला हवे , असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले . भाजप किसान मोर्चाच्या नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या आॅनलाइन बैठकीत पाटील बोलत होते . यावेळी मोर्चाचे प्रभारी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंग ठाकूर , मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ . अनिल बोंडे , किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा , डॉ . संध्या तोडकर , बापूसाहेब पाटील , शेषराव पाटील , रवींद्र अमृतकर आदी आॅनलाइन बैठकीस उपस्थित होते . बैठकीत केंद्र शासनाने पिकांच्या हमी भावात नुकतीच केलेली वाढ , कृषी विषय शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करणे , शेतकºयांचा शेतमाल कुठेही विकता येईल याबाबत केलेला निर्णय , यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी , कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्याचा ठराव संमत करण्यात आला . यावेळी डॉ . अनिल बोंडे , आमदार सुरजितसिंग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन मकरंद कोरडे यांनी केले .