महापौर सतीश कुलकर्णी, खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे, ॲड.राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, प्रशांत जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
शहराला सध्या पाच हजार इंजेक्शनची गरज असताना प्रत्यक्षात पाचशे इंजेक्शनच्या आसपास पुरवठा होत आहे. त्याकारणाने पुरेशा प्रमाणात इंजेक्शन प्राप्त होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना विनाकारण शोध करूनही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे शहराला शंभर मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असताना नगण्य ऑक्सिजन मिळत असल्याने अनेक खासगी रुग्णालये ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सांगत आहे किंवा त्यांचे नातेवाइकांकडून रुगणांचे काही बरेवाईट झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र लिहून घेत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर हा आता रुग्णांसाठी आवश्यक असून, त्याचा व्यवस्थित पुरवठा न झाल्यास जनउद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
इन्फो.
शहरात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा हाेत असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यासंदर्भात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर फाेन बंद करून ठेवतात, अशी तक्रार महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली जर जिल्हाधिकाऱ्यांनी अपुरा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर साठा योग्य व्यक्तीला देण्यासंदर्भात नियाेजन करण्यात येईल, असे सांगितले.
छायचित्र आर फोटोवर २८ मेयर नावाने