शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ब्रिटिशकालीन पूल : एक बंद,१७८ सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:35 PM

नाशिक : दोन आॅगस्ट २०१६ मध्ये मध्यरात्री मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल महापुरामुळे अर्धाअधिक वाहून गेला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या पुलाचे आयुष्यमान संपलेले असतानादेखील पुलाचा वापर वाहतुकीसाठी सुरू असल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील पुरातन पुलांचा प्रश्न समोर आला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आणि नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर प्रत्येक पुलांची तपासणी करण्याचे आदेश आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी तपासणी : आयुष्यमान समाप्त होणाऱ्या पुरातन पुलांचे संरचनात्मक परीक्षण; किरकोळ दुरुस्तीची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन आॅगस्ट २०१६ मध्ये मध्यरात्री मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल महापुरामुळे अर्धाअधिक वाहून गेला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या पुलाचे आयुष्यमान संपलेले असतानादेखील पुलाचा वापर वाहतुकीसाठी सुरू असल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील पुरातन पुलांचा प्रश्न समोर आला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आणि नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर प्रत्येक पुलांची तपासणी करण्याचे आदेश आहेत.नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ ब्रिटिशकालीन पूल आणि १७८ लहान-मोठे पूल आहेत. शासनाच्या आदेशानुसार पावसाळ्यापूर्वी पुलांच्या सक्षमतेची पाहणी करून उपअभियंता तसेच शाखा अभियंत्यांनी बांधकाम विभागाला अहवाल सादर केला. त्यामध्ये सर्वच पूल हे वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्ग, राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गांवर असलेल्या पुलांचे स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आहे. सुचविलेल्याकिरकोळ दुरुस्तीनंतर सर्व पूल सुरू आहेत.पुलाच्या सर्वेक्षणासाठी पूल तपासणी वाहन (ब्रीज इन्सपेक्शन व्हिअकल)चा वापर आवश्यकतेप्रमाणे करण्यात यावा. पायाच्या सखोल तपासणीसाठीचे अद्यायावत तंत्रज्ञान वापरण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. धोक्याचा अर्लट देणारे सेन्सर्सपावसाळ्यात अनेकदा रात्रीतून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढते आणि पुलावरून पाणी वाहू लागते. अशावेळी रात्रीच्या समारास अपघाताचा धोका संभवतो. पुलाला पाणी लागल्याची माहिती संबंधित अभियंत्यांना मिळावी यासाठी गेल्यावर्षी नाशिकमधील २४ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले होते.यावर्षी मात्र सेन्सर्सच्या एजन्सीला मुदतवाढ दिली की नाही, याची माहितीच बांधकाम विभागाला नाही. यंदा पावसाचा जोर कमी असल्याने धोक्याची सूचना देणाºया पुलाच्या सेन्सर्सची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा दिसून आला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे प्रत्येक पुलाची तपासणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर करण्यात यावी, यासाठी सर्व सनियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्यावर असणार आहे.दर पाच वर्षांनी स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे बंधनकारक असले तरी सावित्री नदीवरील घटनेनंतर प्रत्येक वर्षी नियमित तपासणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. पुलाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी अभियंत्यांवर आहे.नाशिक जिल्ह्यात ९ ब्रिटिशकालीन पूल अस्तित्वात आहेत. त्यातील एका पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत, तर एक पूल पुढील वर्षी शंभरी गाठणार आहे. अन्य एक पूल ९५ वर्षांपासून उभा आहे. सुरगाणा तालुक्यातील पार नदीवरील जुना पूल बंद करून नवीन समांतर पूल बांधण्यात आला आहे. इतर पूल सुस्थितीत आहेत.महापालिका हद्दस्ट्रक्चरल आॅडिटचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे व्हिज्युएल इन्स्पेक्शन. साध्या डोळ्यांनी तपासणी करून धोकादायक भागाची पडताळणी करता येते तसेच दुरुस्ती करता येते.व्हिज्युएल इन्सपेक्शनमध्ये एखाद्या पुलाला चीर पडली असेल किंवा दगड निखळला असेल तर तो दुुरुस्त करण्यास सांगितले जाते. दुसºया म्हणजे हॅमर टेस्ट यामध्ये स्ट्रक्चरच्या त्या भागाला हातोड्याने मारून त्याची क्षमता तपासली जाते. कोअर टेस्ट हा स्ट्रक्चरल आॅडिटचा तिसरा प्रकार होय. या प्रकारात ज्या वास्तूचे आॅडिट करायचे आहे, त्या वास्तूची किती दाब, वजनवहन करण्याची क्षमता आहे, हे तपासले जाते. त्याअंतर्गत स्ट्रक्चरचा एक भाग काढून तो कॉम्प्रेसरमध्ये नेला जातो. त्यात कॉम्प्रेसरमध्ये ठेवून तो वजनाने दाबला जातो. वजनाचा दाब टप्प्याटप्प्याने वाढविला जातो आणि वजन सहन न झाल्यास कोअर भाग अखेर फुटतो. याचे मापन स्केलवर केले जात असते. त्यातून त्या स्ट्रक्चरची किती वजन वहनाची क्षमता आहे, ते कळते.शासनाच्या नियमानुसार पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट तसेच नियमित तपासणी करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी संबंधित अभियंत्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून अहवाल घेण्यात आला आहे. पुलाची तपासणी आणि देखरेखीची जबाबदारी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच शाखा अभियंता यांच्यावर सोपविण्यात आलेली असते.- एस. एन. राजभोज, अधीक्षक अभियंता, सा.बां.शहरात तीनसमांतर पूलनाशिक शहरात ब्रिटिशकालीन तीन पूल आहेत. त्याचे प्राथमिक स्ट्रक्चरल आॅडिट महापालिकेने केल आहे. यातील सर्वात महत्त्वाचा गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर पूल होय. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या या पुलाला व्हिक्टोरिया पूल असे नाव होते.स्वातंत्र्योत्तर काळात त्याला अहिल्यादेवींचे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे या पुलाचे शंभर वर्षांचे आयुर्मान संपल्यानंतर ब्रिटिश कंपनीने भारत सरकारला तसे कळविले होते. त्यानंतर १९९९ मध्ये या ठिकाणी समांतर पूल बांधण्यात आला. त्याचे जिजामाता पूल असे नामकरण करण्यात आले आहे. शहरात आडगाव येथे नेत्रावती नदीवर असलेला पूलदेखील ब्रिटिशकालीन असून त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे सहज लक्षात येते. त्या ठिंकाणी महापालिकेने नूतन पूल बांधणे प्रस्तावित केले आहे. तर तिसरा पुल देवळालीगाव येथे वालदेवी नदीवर आहे. त्याची दुरवस्था होण्याच्या आतच महापालिकेने नवीन पर्यायी पूल बांधला आहे. मात्र, नवीनसह जुना पूलदेखील रहदारीस सुरू ठेवला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागTravel Tipsट्रॅव्हल टिप्स