निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी या पुलाच्या सुरुवातीला असलेले लोखंडी कठडे तुटले होते. सदर तुटलेल्या कठड्याचे संरक्षण व्हावे व वाहने तुटलेल्या कठड्याशेजारून सुरक्षितपणे जावी म्हणुन या तुटलेल्या लोखंडी कठड्याच्या शेजारी निफाड पोलीस ठाण्याचे २ बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहे, मात्र रात्रीच्या सुमारास नाशिककडून वेगाने येणाऱ्या वाहन चालकाच्या सदर लावलेले बॅरिकेट्स लक्षात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनावधानाने या बॅरिकेट्सला वाहनांची धडक बसून मोठा अपघात होऊन वाहन नदीत पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर लोखंडी कठडे तातडीने बसवण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.सदर जुन्या पुलाला वाहनांनी धडक देऊन सदर वाहने कादवा नदीत पडून मोठे अपघात व जीवितहानी होण्याचा प्रकार याच ठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे या जुन्या पुलाला सिमेंट काँक्रीटचे भक्कम कठडे बांधण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे. (१४ निफाड)