नाशिक : नाशिकची कन्या स्नेहा कोकणे पाटील यांनी इंडियन बॉडी बिल्डींग फिटनेस फेडरेशन असोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथे झालेल्या "भारत श्री" शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस इंडिया 2019 या स्पर्धेत कास्य पदक मिळवत यश संपादित केले.कोकणे यांनी नाशिकची मान उंचावली असून त्या महिलांना मोफत स्वसंरक्षणाचे धडे देतात. त्यांच्या या यशाबद्दल भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगराच्यावतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.बॉडी बिल्डिंग म्हटलं की पुरु षांचं वर्चस्व असा सर्वसाधारण समज असतो परंतु याही क्षेत्रात मेहनत करून उज्वल यश संपादन करणार्या स्नेह कोकणे यांनी यासाठी अनेक वर्षांपासून मेहनत घेतली होती. या सर्व मेहनतीसाठी स्नेहा यांना त्यांचे पती सचिन कोकणे यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. भाजयुमो पदाधिकार्यांनी स्नेहा कोकणे यांच्या गंगापूर नाका येथील कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी भाजयुमोचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक ड. अजिंक्य साने, शहर सरचिटणीस अमति घुगे, अमोल पाटील, चंद्रशेखर पंचाक्षरी, दिनेश अिहरे, निखीलेश गांगुर्डे, निकेत घोटेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कांस्य पदाच्या मानकरी स्नेहा कोकणे यांचा भाजयुमोतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 7:34 PM
नाशिक : नाशिकची कन्या स्नेहा कोकणे पाटील यांनी इंडियन बॉडी बिल्डींग फिटनेस फेडरेशन असोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथे झालेल्या "भारत श्री" शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस इंडिया 2019 या स्पर्धेत कास्य पदक मिळवत यश संपादित केले.
ठळक मुद्देत्या महिलांना मोफत स्वसंरक्षणाचे धडे देतात.