‘भाऊ-दादां’च्या भेटीने चर्चेला आले उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:59 AM2019-01-18T00:59:19+5:302019-01-18T00:59:51+5:30

सध्याचे दिवस निवडणुकीचे आहेत, पुन्हा ‘एकबार’चा नारा असतानाच दुसरीकडे ‘परिवर्तन’ची हाक आहे. राजकारण पेटू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये मात्र परिवर्तनासाठी आलेले राष्टÑवादीचे दादा म्हणजेच अजित पवार आणि भाजपाचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांची सकाळी गाठ पडली आणि गप्पा मारतांना दोघे कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून थोडे बाजूला जाऊन वेगळे गुप्तगू करू लागल्याने चर्चेला उधाण आले.

'Brother-Dadan' meeting came in discussion! | ‘भाऊ-दादां’च्या भेटीने चर्चेला आले उधाण !

‘भाऊ-दादां’च्या भेटीने चर्चेला आले उधाण !

Next
ठळक मुद्देमहाजन-पवार यांच्यात चर्चा : राजकीय गरम वातावरण गप्पांचा शीतल शिडकावा

नाशिक : सध्याचे दिवस निवडणुकीचे आहेत, पुन्हा ‘एकबार’चा नारा असतानाच दुसरीकडे ‘परिवर्तन’ची हाक आहे. राजकारण पेटू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये मात्र परिवर्तनासाठी आलेले राष्टÑवादीचे दादा म्हणजेच अजित पवार आणि भाजपाचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांची सकाळी गाठ पडली आणि गप्पा मारतांना दोघे कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून थोडे बाजूला जाऊन वेगळे गुप्तगू करू लागल्याने चर्चेला उधाण आले.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच फड रंगू लागला आहे. केंद्रस्थानी अर्थातच सत्तारूढ भाजपा असणे अपरिहार्यच आहे. राफेलपासून आरक्षणापर्यंत आणि शेतकरी आत्महत्यापासून कष्टकऱ्यांच्या हलाखीपर्यंत सर्वच बाबतीत भाजपाचे सत्ताधारी सध्या आरोपीच्या पिंजºयात आहेत. सत्ताधिकाºयांना हटवून परिवर्तन करा, असे सांगत राष्टÑवादीचे नेते राज्यभर फिरत असून बुधवारी (दि.१७) नाशिकमध्येच परिवर्तन यात्रा होती. त्यानिमित्ताने अजित पवार हे सरकारची नामुष्की सांगत असताना सरकारची चमकदार कामगिरीसाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनदेखील नाशिकमध्येच आले. गुरुवारी (दि.१७) सीएम चषक क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डिफेन्स इनोव्हेशनचे उद््घाटन करण्यासाठी महाजन येथे आले असताना दादा आणि भाऊंचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात होता. गुरुवारी सकाळी गिरीश महाजन यांनी आमदार बाळासाहेब सानप आणि अन्य कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षात जाऊन भेट घेतली आणि चर्चाही केली. ही चर्चा मोकळेपणाने होत असतानाच महाजन आणि अजित पवार यांनी काहीसे वेगळे जाऊन चर्चा केली तसेच
आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. उभयतात काय चर्चा
झाली.
सरकारच्या संकटमोचक गिरीश महाजन यांनी सध्या भाजपा सरकारवर आरोपांची राळ उठत असल्याने दादांना जरा सबुरीने घ्या, असा सल्ला तर दिला नाही ना अशी चर्चा दिवसभर उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांत पसरली होती.

Web Title: 'Brother-Dadan' meeting came in discussion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.