शहरं
Join us  
Trending Stories
1
Manipur Voilence : परिस्थिती गंभीर! मणिपूरमध्ये ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवान
2
"CM नितीश कुमार हात जोडत होते..."; तेजस्वी यादवांच्या विधानावर BJP-JDU चा मोठा दावा
3
भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रेमीजनांत वाद-विवाद होतील, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण अडचणीत टाकेल! 
5
IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..."
6
विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांसह आयोगही तयारीला; १३ सप्टेंबरला घेणार तयारीचा आढावा
7
भाजपने उतरविली नेत्यांची फौज; व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे अध्यक्ष
8
भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी?; अजित पवारांनी राजकीय चर्चेवर दिलं स्पष्टीकरण
9
नाफेड कांदा घोटाळा चौकशीला आले पथक; गुजरातच्या अधिकाऱ्यांकडून तपास
10
५-जी फोनच्या विक्रीत अमेरिकेला टाकले मागे; ६ महिन्यांत भारतात जगातील १३ टक्के फोनची विक्री
11
गावागावात पोहोचली वीज, हाती पैसा लागला खुळखुळू; मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा
12
दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे
13
सतत तणाव असलेल्या कोर्टात विनोदी काय घडले ते कळणार; दिल्ली हायकोर्टाचा नवा उपक्रम
14
सहा स्थायी समित्यांची काँग्रेसने केली मागणी; चार समित्या देण्याची केंद्राची तयारी
15
स्वत:ला ब्रह्मांडाचा स्वामी, ‘देवाचा पुत्र’ मानायचा; मानवी तस्करीत गेला तुरुंगात
16
लक्झरी कारच घेणार, अद्याप आकर्षण कायम; ऑगस्टमध्ये विकल्या गेल्या २,७१२ गाड्या
17
बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही
18
हिंदू-मुस्लीम बांधवांचा ४६ वर्षांपासून गणेशोत्सव; सांगोल्यातील साईनाथ गणेश मंडळाचा उपक्रम
19
Jasprit Bumrah Mumbai Indians: "गलत लिखा है..."; जसप्रीत बुमराहला आवडला नव्हता मुंबई इंडियन्स मधला 'इंट्रो'; जुना Video Viral
20
शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस मंगळ! या शेअर्समध्ये मोठी वाढ

दगडाने ठेचून भाजीपाला विक्रेत्याची निर्घृण हत्या; पेठरोडवर मध्यरात्री घडला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 1:54 PM

लागोपाठ खुनांच्या घटनांनी दिले पोलिसांना आव्हान

नाशिक : पंचवटी, म्हसरुळ परिसरासह सिडको भागातसुद्धा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची वाट अडवून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर दगड टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२४) उघडकीस आला.

राजेश ऊर्फ राजु वकिल शिंदे (३५,भराडवाडी,पेठरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाशिक शहर पोलिसांकडून गुन्हेगारांच्या टोळ्यांवर एकीकडे मोक्काची कारवाई केली जात असताना दुसरीकडे गुंडांमधील वर्चस्ववाददेखील उफाळून येताना म्हसरुळ, पंचवटी परिसरात दिसून येत आहे. सराईत गुन्हेगार प्रवीण काकडची त्याच्याच गुंड मित्रांनी केलेल्या हत्येला काही तास उलटत नाही, तोच पुन्हा पंचवटी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राजु शिंदे या व्यक्तीची डोक्यात हल्लेखोरांनी दगड टाकून आणि चेहरा दगडाने ठेचून मध्यरात्री पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळच हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

अत्यंत वर्दळीचा मुख्य रस्ता असतानाही हल्लेखोरांनी शिंदे यांची वाट रोखली. ते बुलेट दुचाकीेने आपल्या भराडवाडी येथील घराकडे जात होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांना थांबवून दगडाने हल्ला चढविला. डोके, चेहरा दगडाने पुर्णत: गंभीरपणे जखमी करुन हल्लेखोर पसार झाले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने शिंदे रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमखी पडले. मयत शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हल्लेखोरांच्या शोधार्थ तपासपथके

राजु शिंदे यांच्यावर हल्ला करुन फरार झालेल्या संशयित आरोपींच्या शोधार्थ पंचवटी, म्हसरुळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकांसह गुन्हे शाखा युनीटचे पथकेही रवाना झाली आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास खूनाची घटना घडली. बुधवारी उशिरापर्यंत शिंदे खूनप्रकरणातील संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते.

मयत शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत काही इसमांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या वादातून कदाचित संशयितांनी शिंदे यांच्यावर हल्ला चढविला असावा असा अंदाज आहे. हल्लेखोरांच्या शोधात तीन ते चार तपासपथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना बेड्या ठोकण्यास यश येईल. नागरिकांनी कुठल्याहीप्रकारच्या अफवा पसरवू नये.- डॉ. सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पंचवटी

टॅग्स :Nashikनाशिक